१४ वर्षांखालील गटात उल्लेखनीय कामगिरी; सांगली येथील विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
कणकवली : कणकवली येथील समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियमची १४ वर्षांखालील गटातील कु. आहना पालव हिने दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे तिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत आहनाने आपल्या बुद्धीचातुर्याचा आणि उत्कृष्ट खेळाचा ठसा उमटवत जिल्हास्तरावर दुसरे स्थान मिळविले. तिच्या या यशाबद्दल शिक्षक प्राजक्त चव्हाण सर तसेच सिंधुदुर्गच्या सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी शीतल शिंदे यांनी तिचे अभिनंदन केले.
आहनाला या यशासाठी मुक्ताई अकॅडमीचे कौस्तुभ पेडणेकर सर तसेच राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू आणि प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, आहना पालव हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुडाळ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख मॅडम, वर्गशिक्षिका खानोलकर मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले असून, आगामी विभागीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
