You are currently viewing सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न सोडवा. त्यात राजकारण नको – संदीप निंबाळकर

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न सोडवा. त्यात राजकारण नको – संदीप निंबाळकर

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न सोडवा. त्यात राजकारण नको – संदीप निंबाळकर

भूमिका जाहीर करा, अन्यथा पुन्हा आंदोलन करणार…

सावंतवाडी

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न सोडवा. त्यात राजकारण नको, असा इशारा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत कोकण प्रवासी रेल्वे संघटनेचे अध्यक्ष संदीप निंबाळकर यांनी दिला.

दरम्यान सावंतवाडी रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे याबाबत सर्वपक्षीयांनी आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत आम्ही योग्य तो पर्याय स्वीकारू रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी दिला.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सचिव मिहीर मठकर, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, अँड सायली दुभाषी, भूषण बादीवडेकर,सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट, सिध्देश सावंत आदी उपस्थित होते.

मिहीर मठकर म्हणाले, माजी आमदार कै जयानंद मठकर यांचा स्मृतिदिन आहे. कै मठकर व कै डि के सावंत यांनी रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी प्रयत्न केले. सारे प्रश्न लक्षात घेता लोकसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार घालावा का? अशी चर्चा आहे. सावंतवाडी टर्मिनस बाबतीत टाळाटाळ केली जात आहे. लोकांना गैरसोयीचा प्रवास करावा लागतो आहे. भारतीय रेल्वेत कोकण रेल्वे विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे त्यासाठी सरकारची भूमिका काय आहे. कोकण रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी चर्चा झाली पाहिजे. उग्र आंदोलन छेडले जाईल.

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर म्हणाले, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ला छुपा विरोध केला जातो आणि पाठिंबाही दिला जातोय,हे ओळखून निवडणूक जाहिरनामा मध्ये कोकण रेल्वे बाबतीत भूमिका घ्यावी. टर्मिनस ला पैसे नाहीत.तर शक्तीपीठ मार्गाला पैसे आहेत. शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता आहे किंवा नाही याची चर्चा झाली पाहिजे.मुंबई रेल्वे स्थानकांवर नाव बदलून देण्याची तयारी दाखवली जाते.पण प्रा मधू दंडवते यांचे नाव टर्मिनसला नाव देण्यास विरोध होतो. प्रा मधू दंडवते व नाथ पै यांचे नाव भाषणात घेतले जाते.पण टर्मिनस ला नाव देण्यास विरोध केला जातो.

अँड संदीप निंबाळकर म्हणाले, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून २६ जानेवारीला उपोषण केले. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोबाईल वर ऑनलाईन पद्धतीने बोलताना प्रा मधू दंडवते यांचे नाव देता येणार नाही. मात्र अन्य सर्व प्रवासी संघटनेचे प्रश्नांची उकल होईल असे म्हटले होते. मात्र राणे आणि दिपक केसरकर यांनी दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष केले.आता लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी टर्मिनस ला उघड पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत. त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी सावंतवाडी टर्मिनस बाबतीत जाहीर बोलावं,जाहीरनाम्यात रेल्वे स्थानक टर्मिनस विषय घ्यावा. रेल्वेमंत्री भेट घडवून आणतो असे आश्वासन देऊन सत्तेतील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला नाही. खासदार विनायक राऊत यांनी निवेदन सरकार दरबारी पोहचवली असे अँड निंबाळकर यांनी सांगितले ते म्हणाले,टर्मिनस साठी आंदोलन छेडले गेले, टर्मिनस भूमिपूजन झाले आणि नऊ वर्ष रखडले आहे. टर्मिनस ला विरोध आणि बाजू घेणारे आज एकत्र आहेत.

रेल्वेमंत्री यांना भेटल्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आश्वासन दिले होते. मात्र प्रवाशांची गैरसोय होत आहे याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा