मिडिया....
प्रिंट मिडिया असो वा सोशल मिडिया..

तुमच्या आमच्या सर्वांसमोर समाजातील विविध गोष्टी, बातम्या, लेख, अनेक कथा, कल्पना, काव्य, स्थळविशेष, व्यक्तीविशेष, प्रवासवर्णन वा खाद्यभ्रमंती एक ना अनेक विषय आणून उभे करतात.

प्रिंट मिडियाबरोबरच तात्काळ एका क्लिक वर क्षणाक्षणांची माहिती उपलब्ध... त्यामुळेच लोक जास्त आकर्षिले गेलेत ते सोशल मिडियाकडे...
संवाद मिडियाने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण शैलीमुळे वाचकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. संवाद मिडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

अवघ्या काहीच महिन्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र, गोव्यातील लोकांच्या पसंतीस उतरलेला संवाद मिडिया आता आपल्या वेबसाईटवर...

संवाद मिडियाशी जोडलेले रहा, कारण....
संवाद तुमचा - आमचा, उभ्या महाराष्ट्राचा...

 ..व्हिजन..

संवाद मिडिया हे समाजात घडणाऱ्या विविध घटना, कला, क्रीडा, शैक्षणिक, साहित्यिक, शेती, गुन्हेगारी विषयक माहिती समाजापुढे आणण्याचे काम करते. भविष्यात पत्रकारितेला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचे संवाद मिडियाचे ध्येय्य आहे.

 

  ..आयडिओलॉजी..

संवाद मिडिया जे सत्य असेल तेच समाजापुढे आणते. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, घडणाऱ्या घटनांचा अचूक वेध घेऊन त्या समाजाच्या दृष्टीस येतील अशापद्धतीने मांडणे. जनजागृती करून लोकभावाना जपणे. गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी गुन्ह्यांना वाचा फोडणे.

  ..मिशन..

पत्रकारिता करताना संवाद मिडिया लोकशाही, मुक्त भाषण, विश्वासार्ह माहिती देणे यासाठी कार्य करते. संवाद मिडिया डिजिटल ग्राहक आणि व्यवसाय सेवा, तसेच विक्रेते, खरेदीदार आणि उत्पादने यांना एकच व्यासपीठ देते.