अभिषेक गावडे यांच्या हस्ते कुडाळात दिवाळी पाडव्याच्या बैल सजावट व नगर प्रदक्षिणेचा शुभारंभ
३५ शेतकऱ्यांचा बैलजोड्या व सजवलेल्या बैलगाड्यांसह सहभाग; शिवसेना व युवा सेनेचा उपक्रम उत्साहात
कुडाळ :
दिवाळी पाडवा २०२६ निमित्त कुडाळ शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने नगर प्रदक्षिणा तसेच बैल व बैलगाड्यांच्या आकर्षक सजावट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज सायंकाळी पार पडलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना कुडाळ शहरप्रमुख अभिषेक गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या उपक्रमाला कुडाळ शहरासह परिसरातील बैल मालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल ३५ शेतकऱ्यांनी आपल्या सजवलेल्या बैलांसह आणि आकर्षक सजावट केलेल्या बैलगाड्यांसह नगर प्रदक्षिणेत सहभाग घेतला. कुडाळ येथील गांधी चौकातून या रॅलीला सुरुवात झाली. बाजारपेठ, शिवाजीनगर मार्गे जिजामाता चौक आणि तेथून पुन्हा गांधी चौक असा नगर प्रदक्षिणेचा मार्ग होता.

बैलांना पारंपरिक पद्धतीने सजवून तसेच बैलगाड्यांना आकर्षक रूप देऊन सहभागी झालेल्या बैल मालकांनी दिवाळी पाडव्याचा उत्साह द्विगुणित केला. ही नगर प्रदक्षिणा पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. या उपक्रमातून कोकणातील समृद्ध शेतीसंस्कृती, बैलांप्रती असलेली कृतज्ञता आणि पारंपरिक सणांचे महत्त्व अधोरेखित झाले.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, नगरसेवक विलास कुडाळकर, उपशहरप्रमुख चेतन पडते, शाखाप्रमुख बंड्या काळप, राजाराम गडेकर, संदेश सावंत, विजय जाधव, अपु राणे, हाजीम मुजावर, दीपक सावंत, ओंकार माडवळ, नागेश राणे, आनंद पाचेकर, प्रशांत टेंबुलकर, बाबू टेंबुलकर, अम्मार मुजावर, आबा पावसकर, मंदार कोचरेकर, समीर परब, तुषार गुरव, दादू कुंभार, शुभम कुंभार आदी उपस्थित होते.
ग्रामसंस्कृती आणि शेतीपरंपरेचा जागर करणारा हा उपक्रम बैल मालक व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे उत्साहात पार पडला.