You are currently viewing हजारो दिव्यांनी उजळला सावंतवाडीचा मोती तलाव; अभिनव फाउंडेशनचा अनोखा दीपोत्सव

हजारो दिव्यांनी उजळला सावंतवाडीचा मोती तलाव; अभिनव फाउंडेशनचा अनोखा दीपोत्सव

हजारो दिव्यांनी उजळला सावंतवाडीचा मोती तलाव; अभिनव फाउंडेशनचा अनोखा दीपोत्सव

दीपोत्सवानंतर तलाव परिसराची स्वच्छताही; सामाजिक बांधिलकी जपत राबविला अभिनव उपक्रम

सावंतवाडी :

दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्गतर्फे सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठी भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने मोती तलाव परिसर उजळून निघाला. सावंतवाडीकरांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
तलावाच्या काठाचे सौंदर्य अबाधित राहावे आणि मेणामुळे परिसर अस्वच्छ होऊ नये, यासाठी फाउंडेशनतर्फे विशेष प्रकारच्या दिव्यांची निवड करण्यात आली होती. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी कुटुंबीयांसह या दीपोत्सवात सहभाग घेतला. यावेळी लखन राजे यांनीही विशेष सहभाग नोंदविला.

या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे दीपोत्सवानंतर फाउंडेशनच्या सदस्यांनी तलावाच्या काठावर राहिलेले दिवे स्वतः गोळा करून परिसराची स्वच्छता केली. प्रकाशोत्सवासोबतच स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या अभिनव फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा