You are currently viewing ओटवणेत १५ नोव्हेंबरला शिवकालीन वारसा व शस्त्र प्रदर्शन

ओटवणेत १५ नोव्हेंबरला शिवकालीन वारसा व शस्त्र प्रदर्शन

ओटवणेत १५ नोव्हेंबरला शिवकालीन वारसा व शस्त्र प्रदर्शन

किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळाही होणार; सतीदेवी युवक कला क्रीडा मंडळ व संकल्प सेवासंघाचा उपक्रम

सावंतवाडी

श्री सतीदेवी युवक कला क्रीडा मंडळ आणि संकल्प सेवासंघ, मांडवफातरवाडी, ओटवणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किल्ले बांधणी स्पर्धा २०२६ निमित्त रविवार, १५ नोव्हेंबरला शिवकालीन वारसा व शस्त्र प्रदर्शन तसेच बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ६ वाजता कै. नारायण (नाना) येसो वर्णेकर रंगमंच, श्री सतीदेवी मंदिर येथे शिवकालीन वारसा व शस्त्र प्रदर्शन होणार आहे. यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान, कोकण विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. रात्री ८ वाजता किल्ले बांधणी स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार असून सहभागी संघांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांचा वारसा आणि पारंपरिक शस्त्रसंस्कृतीची ओळख व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला ग्रामस्थ, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा