You are currently viewing मातोंड येथे सकाळी एस टी बस आणि बोलेरोत अपघात

मातोंड येथे सकाळी एस टी बस आणि बोलेरोत अपघात

वेंगुर्ले

वळणाचा अंदाज न आल्यामुळे एसटी आणि बोलेरो पिकअप यांची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे घडली. बस चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र बोलेरोच्या दर्शनी भागाचे आणि एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित एसटी सावंतवाडी येथून तळवडे, मातोंड, अणसुरपाल मार्गे वेंगुर्लेच्या दिशेने जात होती. यावेळी मातोंड येथे एका अवघड वळणावर समोरून येणाऱ्या बोलेरोचा आणि एसटीचा दोन्ही चालकांना अंदाज न आल्यामुळे अपघात झाला. दरम्यान प्रसंगावधान दाखवत एसटी चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तर बोलेरोचा समोरील भाग एसटीचा साईड पत्रा भेदून आत घुसला आहे. त्यामुळे दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने बोलेरो चालक बालंबाल बचावला. तर एसटी मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा कोणती दुखापत झाली नाही. दरम्यान अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा