You are currently viewing केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक १३ जून रोजी मालवणात

केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक १३ जून रोजी मालवणात

जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी यावेळी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात – विष्णू मोंडकर

 

मालवण :

 

केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक सोमवार १३ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी ५ वाजता हॉटेल चिवला बीच येथे ते पर्यटन व्यवसायिकांच्या समस्या, प्रश्न जाणून घेणार आहेत. तरी जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी यावेळी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन पर्यटन व्यवसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून राज्य व केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. तसेच केंद्र सरकारने शाश्वत पर्यटन वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेतला आहे. केंद्र व राज्य सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता देऊनही दोन दशकांपेक्षा जास्त काळ होऊनही आवश्यक ती नियमावली व प्रशासकीय मदत जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांस झाली नाही. जिल्ह्यातील पर्यटन कुठल्याही शासकीय मदतीशिवाय आंतरराट्रीय पातळीवर पोहोचविण्यात जिल्ह्यातील पर्यटन व्यासायिकांचा मोठा हातभार आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायात असलेल्या व्यावसायिकांच्या अडीअडचणी समजून त्यावर केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक सोमवारी मालवण येथे उपस्थित राहून जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या समजून घेणार आहेत.

तसेच पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पासंबधी माहिती घेणार आहेत. जिल्ह्यामध्ये सागरी पर्यटनाच्या सोबत कल्चर, हिस्ट्री, मेडिकल, फूड, जलक्रीडा, साहसी क्रीडा, ऍग्रो टुरिझम क्षेत्रात केंद्र सरकारच्या माध्यमातून स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना अपेक्षित आवश्यक त्या सोयीसुविधा, आवश्यक शासकीय अध्यादेश तसेच रस्ते, पाणी, वीज या दळणवळणाच्या साधनांमध्ये केंद्र सरकारने आवश्यक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. तरी जिल्ह्यातील होमस्टे, जलक्रीडा, हॉटेल, टूर तसेच सर्व प्रकारच्या पर्यटन व्यावसायिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून जिल्ह्यात पर्यटन वाढींसाठी येत असलेल्या समस्या तसेच आवश्यक सरकारी मदत विषयी मागणी करावी, असे आवाहन बाबा मोंडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 1 =