कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी गौरव; प्रशासकीय सेवेत दिलेल्या योगदानाचा केला विशेष उल्लेख
कणकवली :
देवगडचे सेवानिवृत्त तहसीलदार रमेश पवार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी त्यांचा सत्कार करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी तहसीलदार रमेश पवार यांनी आपल्या सेवाकाळात केलेल्या कामकाजाचे कौतुक करत प्रशासनातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला. तसेच सेवानिवृत्तीनंतरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अशोक करंबळेकर, मंदार सापळे, नायब तहसीलदार दिलीप पाटील, श्री. नागावकर, नायब तहसीलदार श्री. खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रमेश पवार यांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
