You are currently viewing करुळ येथील अपघातात वृद्ध जखमी…

करुळ येथील अपघातात वृद्ध जखमी…

करुळ येथील अपघातात वृद्ध जखमी…

कणकवली

हुंबरट-फोंडा मार्गावरून चालणारे पादचारी बापू कृष्णा जाधव (60 रा. करुळ- गोपाळवाडी) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत ते जखमी झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी 7 वा. सुमारास हुंबरट-फोंडा मार्गावरील करुळ येथे घडला. अपघातग्रस्त बापू जाधव यांना ग्रामस्थांनी येथील कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जाधव यांना धडक दिलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अपघातप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जाधव यांच्या नातेवाईकांकडून कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल प्रक्रिया सुरु होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा