पिंगुळीतील सखे सोबती मित्रमंडळाला अॅक्युरेट इंजिनिअरिंगचे मालक कौसर खान यांची दिवाळी भेट; ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान
गरजू रुग्णांना मिळणार आरोग्यसेवेचा आधार; पिंगुळीवासीयांना प्रथम प्राधान्य
कुडाळ :
सामाजिक बांधिलकी जपत अॅक्युरेट इंजिनिअरिंगचे मालक कौसर खान यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पिंगुळी येथील सखे सोबती मित्रमंडळाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिला. दहीहंडी उत्सव २०२६ दरम्यान त्यांनी दिलेला शब्द पाळत ही वैद्यकीय सुविधा मंडळाकडे सुपूर्द केली.
मंडळाच्या माध्यमातून यापूर्वीच गरजू रुग्णांसाठी दोन बेड आणि नेब्युलायझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची भर पडल्याने आरोग्यसेवा उपक्रमाला अधिक बळ मिळणार आहे. या सुविधेचा लाभ गरजू रुग्णांना घेता येणार असून पिंगुळी गावातील रहिवाशांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
यावेळी कौसर खान यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी भूषण तेजम, दीपक गावडे, अमित तेंडुलकर, सतीश माड्ये, मंगेश चव्हाण, बाबल गावडे, राज वारंग, स्वप्निल शिंदे, रामा पिंगुळकर, केतन शिरोडकर, वैभव धुरी, प्रियदर्शन कुडव, विपुल प्रभू, संग्राम खानोलकर आदी उपस्थित होते.
