You are currently viewing रिक्षा संघटनेच्यावतीने उद्या तळेरेत धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

रिक्षा संघटनेच्यावतीने उद्या तळेरेत धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

तळेरे

सालाबादप्रमाणे याही वर्षी रिक्षा संघटना तळेरेच्यावतीने आज मंगळवार दि.८फेब्रुवारी रोजी सत्यनारायण महापूजा निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स.८ वा.श्री सत्यनारायण महापूजा, स.९ वा.
ढोलवादन,स.१० वा.
तीर्थप्रसाद,स.११वा.
स्थानिक भजन-
(गांगेश्वर भजन मंडळ तळेरे बुवा. संतोष तळेकर यांचे सुस्वर भजन),दु.१वा.पंचक्रोशीतील इ. १०वी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार (गुणगौरव) समारंभ,दु.२वा.खास आकर्षण -जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा,
दु.३ते सायं५ वा.महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व भाविकांनी, ग्रामस्थांनी व हितचिंतकांनी सर्व कार्यक्रम उपस्थित रहावे असे रिक्षा संघटना तळेरेचे अध्यक्ष राजकुमार तळेकर,व खजिनदार संजय पेंढारकर व सर्व सभासदांनी आवाहन केले आहे.

फोटो- ७/२/२०२२

रिक्षा व पत्रिका

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 19 =