You are currently viewing भारतरत्न डॉ आंबेडकर जयंती निमित्त वैभववाडीत काढण्यात आली भव्य अभिवादन रॅली

भारतरत्न डॉ आंबेडकर जयंती निमित्त वैभववाडीत काढण्यात आली भव्य अभिवादन रॅली

तालुका बौद्ध सेवा, माता रमाई महिला मंडळाचे आयोजन

वैभववाडी

वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्यावतीने भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन ते दत्तमंदिर वैभववाडी दरम्यान भव्य अभिवादन रॕली काढण्यात आली. रॕलीत अबालवृध्द पांढरी शुभ्र वस्ञ परिधान करुन सहभागी झाली होती. डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छञपती शिवाजी महाराज की जय, भगवान बुध्दांचा विजय असो अशा महापुरुषांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रमाची सुरुवात स्मारकातील पुर्णाकृती पुतळ्याला कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, सचिव रविंद्र पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर तालुका संघाचे बौध्दाचार्य महेंद्र यादव,संतोष कदम, विश्वास पेडणेकर, मंगेश कांबळे, सुरेंद्र यादव,अभय कांबळे यांनी विधी संचलन केले.
तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरचिटणीस रविंद्र पवार यांनी केले. यावेळी महिला मडळाच्या अध्यक्षा शारदा कांबळे, अध्यक्ष भास्कर जाधव, वासंती तानवडे यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर तालुक्यातील कलाकारांनी सादर केलेला बुध्द-भीम गीतांचा शाहीरी जलसा या कार्यक्रमांने सर्वांना मंञमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन राजेंद्र पवार यांनी केले.
यावेळी कार्याध्यक्ष सुभाष कांबळे , मोहीनी कांबळे, उपाध्यक्ष राजेंद्र कुसूरकर, संजय जंगम, प्रफुल्ल जाधव, धोंडीराम तांबे,धर्मरक्षित जाधव, माजी उपाध्यक्ष संजय जाधव, जेष्ठ कार्यकर्ते धनाजी जाधव, गंगाराम कांबळे, शिवाजी पवार, सुरेश यादव, रुपेश कांबळे, दिपाली जाधव, सुरेश जाधव, अजित कदम, प्रशांत कदम, ऋचा पवार मारुती कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा