You are currently viewing कृषी व महसूल मध्ये योग्य समन्वय साधून नुकसान भरपाई त्वरित द्या : मदन राणे

कृषी व महसूल मध्ये योग्य समन्वय साधून नुकसान भरपाई त्वरित द्या : मदन राणे

दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात गेल्या वर्षी जुलै-ऑगस्ट मध्ये आलेल्या अतिवृष्टीच्या पुरामुळे अनेक लोकांचे शेती,बागायती, घरे-दारे यांची नुकसानी झाली होती. त्याची नुकसानभरपाई महसूल विभागाकडे जमा झाल्याचे कळाले, त्यामुळे सदरची नुकसान भरपाई या नुकसानग्रस्तांना मिळावी ही आग्रही मागणी असताना कागदपत्राच्या अपूर्ततेमुळे ती मिळण्यास अडचणी येत आहेत. यासाठीच महसूल विभाग व कृषी विभाग यांच्यात योग्य समन्वय राखून कागदपत्रांची या नुकसान ग्रस्तानकडून कडून पूर्तता करून घ्यावी व लवकरात लवकर ही नुकसान भरपाई नुकसान ग्रस्ताना मिळावी अशा आशयाचे निवेदन आज तहसीलदार दोडामार्ग यांना युवासेना समन्वयक मदन राणे यांनी दिले आहे.
आधीच कोरोनाच्या या परिस्थितीत आर्थिक दृष्ट्या कमकुवत बनलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल त्यासाठी ही नुकसानभरपाई त्वरित वितरित करण्याची मागणीही त्यांनी या निवेदनात केली आहे. तर याला उत्तर देताना दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांनी आपल्याकडे ५७ लाख रुपये गेल्यावर्षीची नुकसान भरपाई तर या वर्षीची ३ लाख रुपये नुकसानभरपाई जमा झाल्याचे सांगताना येत्या दोन-तीन दिवसात कृषी विभाग व महसूल विभाग यांच्यात योग्य समन्वय साधून ही नुकसान भरपाई संबंधितांना वितरित केली जाईल असे स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + eleven =