You are currently viewing वीज ग्राहक संघटना व कार्यकारी अभियंता महावितरण श्री.तनपुरे यांच्यातील बैठकीत घेतले सकारात्मक निर्णय

वीज ग्राहक संघटना व कार्यकारी अभियंता महावितरण श्री.तनपुरे यांच्यातील बैठकीत घेतले सकारात्मक निर्णय

*वीज ग्राहक संघटना व कार्यकारी अभियंता महावितरण श्री.तनपुरे यांच्यातील बैठकीत घेतले सकारात्मक निर्णय*

*वीज ग्राहक संघटना जिल्हा तथा सावंतवाडी तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती*

सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सहकार्याने गावागावातील वीज ग्राहकांसोबत एकत्र बैठक घेत वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या. सदरच्या समस्या निवारण्यासाठी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड, जिल्हा वीज ग्राहक संघटना पदाधिकारी व इतर कार्यकारणी सदस्य यांनी तत्परतेने महावितरणच्या जिल्हा कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेण्याचे ठरविले. सदरची बैठक महावितरण कुडाळचे कार्यकारी अभियंता श्री.तनपुरे, उपकार्यकारी अभियंता श्री.मिसाळ व सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता श्री कुमार चव्हाण, कनिष्ठ अभियंता सुहास परब यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा होऊन गुरुवारी सायंकाळी ४.०० वाजता सावंतवाडी उपविभागीय कार्यालयात पार पडली. या बैठकीसाठी वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, उपाध्यक्ष आनंद नेवगी, तालुका समन्वयक गणेश तथा बाळ बोर्डेकर, कार्यकारणी सदस्य पुंडलिक दळवी, कृष्णा गवस, अनिकेत म्हाडगुत, संतोष तावडे, समीर माधव आदी उपस्थित होते.
वीज ग्राहक संघटना पदाधिकारी तसेच माडखोल, बांदा उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील सरपंच आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.तनपुरे, उपकार्यकारी अभियंता श्री मिसाळ, उपकार्यकारी अभियंता श्री कुमार चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तालुक्यातील उपकेंद्रांच्या अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील वेगवेगळ्या समस्यांवर सकारात्मक चर्चा होऊन धोरणात्मक असे निर्णय घेण्यात आले. यावेळी सांगेली उपकेंद्रच्या अंतर्गत येणारे माडखोल, सांगेली, सावरवाड, कलंबिस्त, शिरशिंगे, पारपोली, देवसु, दानोली, आंबोली, चौकुळ, गेळे इत्यादी गावांमध्ये पुढील आठवड्यात वीज तारांना अडचणीची ठरणारी झाडी तोडण्यासाठी कंत्राटदाराची गाडी पाठविण्याचे ठरविण्यात आले. जेणेकरून झाडांच्या फांद्या लागून ट्रीप होऊन वीज वितरणात येणारा अडथळा बहुतांश कमी होण्याची शक्यता आहे. वीज ग्राहक संघटनेने ग्राहकांसोबत घेतलेल्या बैठकांमध्ये आंबोली, चौकूळ, कलंबीस्त आदी अनेक गावांमध्ये असलेले जुने मुळातून गंजलेले वीज खांब बदलण्याबाबत निर्णय झाला असून ज्या गावांमध्ये विजेचे खांब सडलेले आहेत त्यांचा सर्वे करून त्याची यादी महावितरणला सोपवून उपलब्ध असलेल्या वीज खांबांमधून तात्काळ अत्यंत आवश्यक असलेले वीज खांब बदलण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आंबोली सह इतर ज्या ज्या गावांमध्ये वीज वाहिन्या लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत त्या देखील तात्काळ दुरुस्ती करण्याचे ठरविण्यात आले.
सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे मध्यंतरी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर वायरमन उपलब्ध नसल्याने गावात वीज वितरणात मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेथे आयटीआय पूर्ण केलेला उमेदवार असल्यास त्याला तात्काळ नियुक्ती देऊन वायरमन उपलब्ध करून देणार असल्याचे श्री. तनपुरे यांनी सांगितले. श्री. तनपुरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेअंती सांगेली उपकेंद्रातील गावांमध्ये तात्काळ झाडी कटिंग करण्यासाठी गाडी पाठविण्याचे दिवस ठरविण्यात आले. त्याप्रमाणे 3 जानेवारी रोजी सांगेली, 4 जानेवारी सावरवाड, वेर्ले, 5 जाने. शिरशिंगे, 6 जानेवारी माडखोल, 9 व 10 जाने. आंबोली, चौकूळ, गेळे आदी गावांमध्ये गाडी जाणार आहे. सदर गावांतील सरपंच, उपसरपंच आणि संघटना सदस्यांनी कुठे कुठे अडचणी आहेत त्या दाखविण्याचे नियोजन ठेवावे असे आवाहन केले आहे. सदरचा कार्यक्रम वेळेत पार पडल्यानंतर दानोली, कारिवडे, केसरी, पारपोली, सातुळी बावळट गावांमधील झाडी तोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर ओटवणे, दाभिळ येथील वीज समस्यांबाबत देखील सकारात्मक चर्चेतून निर्णय घेण्यात आले.
कार्यकारी अभियंता महावितरण कुडाळ श्री तनपुरे, उपकार्यकारी अभियंता श्री मिसाळ, उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण आदींसोबत झालेली चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी वीज ग्राहक संघटना आणि महावितरण अधिकारी यांनी समन्वय साधून तालुक्यातील वीज समस्या मार्गी लावण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीसाठी सौ.देवयानी पवार (सरपंच सावरवाड), सौ.रेश्मा तेली (ग्राम. सदस्या सावरवाड), आनंद राऊळ (कारीवडे), रामचंद्र राऊळ (तळवडे), आदींसह संघटना सदस्य, वीज ग्राहक उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − eight =