You are currently viewing स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे – श्री.सत्यवान रेडकर

स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे – श्री.सत्यवान रेडकर

वैभववाडी

आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी न घाबरता स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे असे आवाहन श्री. सत्यवान रेडकर यांनी केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित, आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित केलेल्या तिमिरातुनी तेजाकडे या स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. रेडकर बोलत होते. तिमिरातुनी तेजाकडे या कार्यक्रमांतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी क्रांतिकारी चळवळ अंतर्गत वैभववाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वैभववाडी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे होते.सुरुवातीला सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत व महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्गचे सुपुत्र, प्रमुख मार्गदर्शक श्री.सत्यवान रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी,मुंबई सीमाशुल्क,भारत सरकार) समन्वयक श्री. दशरथ शिंगारे, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ.अजित दिघे, इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन. पाटील, प्रा.सचिन भास्कर, प्रा.विजय शिंदे व पत्रकार श्री. उज्वल नारकर उपस्थित होते.


स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ? स्पर्धापरीक्षेची ओळख, स्पर्धा परीक्षेची प्राथमिक माहिती, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, त्यांचा अभ्यासक्रम याविषयी श्री. रेडकर यांनी सविस्तर माहिती दिली. कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी बुद्धिमत्ता असून या बुद्धिमत्तेला योग्य दिशा दिल्यास स्पर्धा परीक्षा अवघड नाही. त्यासाठी फक्त योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. आम्ही या अभियानाच्या माध्यमातून सर्वांना मोफत मार्गदर्शन देत आहोत आणि देणार आहोत. त्याचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन रेडकर यांनी केले. इयत्ता दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम हाच स्पर्धा परीक्षेचा मूळ पाया असून महाविद्यालय स्तरावर त्याचे योग्य नियोजन केल्यास स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना उपयोग होतो.सर्व विद्यार्थ्यांनी आशा या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपले स्वप्न पूर्ण करावे असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सी.एस. काकडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला तालुक्यातील हायस्कूल, जुनिअर कॉलेज आणि महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ. अजित दिघे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.विजय शिंदे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + four =