You are currently viewing सावंतवाडीचा युवा उद्योजकाने वेधलं लक्ष

सावंतवाडीचा युवा उद्योजकाने वेधलं लक्ष

राजापूर येथील देवेंद्र फडणवीस प्रचार सभा

 

सावंतवाडी :

राजापूर येथे होत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेत सावंतवाडीच्या दिपेश शिंदे यांनी युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस विशाल परब यांच्या सौजन्याने स्वतःचे शरीर भाजपामय रंगवून सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळी तापु लागला आहे. उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते बैठकीवर जोर देऊन लागले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीत भाजपाकडून नारायण राणे हे निवडणुक रिंगणात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवरील आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा राजापूर येथे आयोजित केली आहे. या सभेत भाजपाच्या संपुर्ण अंग भाजपामय रंगविलेल्या सावंतवाडीच्या दिपेश शिंदे यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

युवा उद्योजक विशाल परब यांच्या माध्यमातून आणि सौजन्याने श्री शिंदे यांनी अंगावर ही रंगरंगोटी केली आहे. एकप्रकारे कळम हे चिन्ह जनतेपर्यंत पोहचवून लाडक्या दादांना पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी विशाल परब यांनीही जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा