You are currently viewing सावंतवाडी शहरातील युवकांचा जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश….

सावंतवाडी शहरातील युवकांचा जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश….

माजगाव-गरड येथील युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

पुंडलिक दळवींचे नेतृत्व; जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची उपस्थिती..

सावंतवाडी
राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन येथील माजगाव – गरड भागातील युवकांनी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

शहरातील नियाज शेख यांच्यासोबत अमीर शेख, साहिल शेख, सोहेल शेख, रिषभ शेख, आकाश नायक, भरत चौगुले, अरबाज शेख, अब्रार शेख, करण गौड, जमीर शेख, सोहेल बॅग, नासिर शेख आदी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळें, अनंत पिळणकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, उद्योग व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, जिल्हा उपाध्यक्ष आशिष कदम, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, सरचिटणीस सुरेश वडार, कृषी जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, तालुकाध्यक्ष उद्योग-व्यापार नवल साटेलकर, डॉ. अभिनंदन मालंडकर, रुपेश जाधव, याकुब शेख, फैज शेख आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 11 =