You are currently viewing जिल्ह्यात 12 वीच्या परीक्षेसाठी 180

जिल्ह्यात 12 वीच्या परीक्षेसाठी 180

10 वी च्या परीक्षेसाठी 113 विद्यार्थी प्रविष्ट होणार

सिंधुदुर्गनगरी

10 वी व 12 वीच्या पुरवणी परीक्षा दिनांक 10 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये पार पडणार आहेत. या परीक्षांना जिल्ह्यातील एकूण 293 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. त्यापैकी 180 विद्यार्थी हे 12 वीच्या परीक्षेस तर 113 विद्यार्थी हे 10 वी च्या परीक्षेस बसणार आहेत. सदर परीक्षांसाठी 2 भरारी पथके तराय करण्यात आली आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे एक आणि निरंतर शिक्षण शिक्षणाधिकारी यांचे एक अशी दोन भरारी पथके असणार आहेत.

   या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. या बैठकीस जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सातत्यपूर्ण व्यावसायिक शिक्षणचे डॉ. प्रकाश जाधव, निरंतर शिक्षणचे शिक्षणाधिकारी अनिल तिजारे, परिवहन महामंडळाचे श्री. गोसावी, पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

12 वीच्या परीक्षांसाठी सावंतवाडी येथील खेमराज महाविद्यालय व कणकवली येथील एस.एम. महाविद्यालय असे दोन केंद्र आहेत. सावंतवाडी येथील केंद्रावर 106 आणि कणकवली येथील केंद्रावर 74 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर 10 वी च्या परीक्षांसाठी केळुसकर हायस्कूल, सावंतवाडी आणि एस.एम.हायस्कुल कणकवली अशी दोन केंद्र आहेत. सावंतवाडी येथील केंद्रावर 10 वीच्या परीक्षेसाठी 70 आणि कणकवली येथील परीक्षा केंद्रावर 43 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

सदर परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझर, थर्मल गन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच एखाद्या विद्यार्थ्यास तापा सारखी लक्षणे असल्यास त्याची स्वतंत्र ब्लॉकमध्ये व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली. कोविडच्या पार्श्वभूमीवर एका ब्लॉकमध्ये 10 ते 12 विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यावश्यक गरजेसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य यंत्रणेचे सहकार्य घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी यावेळी दिल्या. तर परीक्षा केंद्राच्या परीसरामध्ये कलम 144 लागू करण्याच्याही सूचना यावेळी दिल्या. पेपरच्या कस्टडीसाठी हत्यारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महामडळाने गाड्यांचे नियोजन केले असून वेळेत गाड्या सोडण्यात येतील असे महामंडळाच्या प्रतिनिधींनी बैठकीत सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + eighteen =