You are currently viewing मराठी माणसाच्या एकजुटीने राज्य सरकारला नमवले हिंदी भाषा सक्तीचा जीआर सरकारने केला रद्द

मराठी माणसाच्या एकजुटीने राज्य सरकारला नमवले हिंदी भाषा सक्तीचा जीआर सरकारने केला रद्द

*मराठी माणसाच्या एकजुटीने राज्य सरकारला नमवले हिंदी भाषा सक्तीचा जीआर सरकारने केला रद्द.*

*कुडाळ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.*

कुडाळ

महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली ते चौथीसाठी शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरे यांनी पाच जुलैला मराठी माणसांचा मोर्चा जाहीर केला होता. त्याला सर्व राजकीय पक्षांचा पांठीबा मिळत होता.
त्याचप्रमाणे मराठी जनता, मराठी कलाकार , साहित्यिक , कवी , यांचा देखील जोरदार पाठींबा मिळत होता. या मराठी माणसाच्या एकजुटीने आज राज्य सरकारला नमवले व हिंदी सक्ती चा निर्णय सरकार ला मागे घ्यावा लागलाच..
हा खर्या अर्थाचे तमाम मराठी जनांचा विजय आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा विजय आहे. असे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी या वेळी सांगितले.
या प्रसंगी उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उप तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, प्रथमेश धुरी विभाग अध्यक्ष, विद्यार्थी सेना यतीन माजगावकर , शुभम धुरी, माजी उप शहर अध्यक्ष वैभव परब ,दिनार चव्हाण रिक्षा व्यावसायिक बाळा वेंगुर्लेकर, संजय मसुरकर, नागेश जळवी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा