You are currently viewing श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट उपाध्यक्ष गणू यशवंत राऊळ (गुरुजी) यांचा सद्गुरु श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या हस्ते सत्कार

श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट उपाध्यक्ष गणू यशवंत राऊळ (गुरुजी) यांचा सद्गुरु श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या हस्ते सत्कार

सावंतवाडी :

 

सावंतवाडी येथील श्री.काडसिद्धेश्वर से.स.ट्रस्ट, माठेवाडा या अध्यात्म केंद्रात भक्तांच्या अलोट गर्दीत श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींचे दर्शन व प्रवचन असा सत्संग आनंद सोहळा पार पडला. यावेळी श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट उपाध्यक्ष, निवृत्त शिक्षक श्री.गणू यशवंत राऊळ यांच्या श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.

मळगाव येथील श्री.राऊळ गुरुजी म्हणजेच गणू यशवंत राऊळ हे श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, सावंतवाडीच्या स्थापनेपासून ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून आध्यात्मिक सत्संगात कार्यरत आहेत. शिक्षक म्हणून ते निवृत्त झाले असून सेवाभावी वृत्ती, शांत स्वभाव आणि दातृत्व गुण अंगी असणारे असे हे व्यक्तिमत्त्व..! श्री.काडसिद्धेश्वर स्वामींचे परमभक्त असून वयाच्या ९३ व्या वर्षी देखील प्रकृती साथ देत नसतानाही सत्संग कार्यक्रमात हिरहिरीने भाग घेतात. गेली अनेक वर्षे श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्टच्या उपक्रमांना ते आर्थिक हातभार लावत असून मठाच्या जीर्णोद्धार साठी त्यांनी ५००००/- रुपये देणगी दिली होती. दरवर्षी मठात होणाऱ्या सत्संग आनंद सोहळ्यासाठी देखील ते आर्थिक मदत देतात. यात अनुक्रमे २०२३ व २०२४ या दोन्ही सत्संग आनंद सोहळ्यासाठी प्रत्येक वर्षी २००००/- रुपये अशी भरीव मदत त्यांनी दिली आहे. सिद्धागिरी संस्थान, कणेरी मठाला देखील ते गो शाळेतील चारा व्यवस्थापन व मठातील इतर कामांसाठी आर्थिक देणगी देत असतात. माणसाकडे अमाप संपत्ती असली तरी देण्याची दानत लागते. अशी देण्याची दानत असलेल्या राऊळ गुरुजींच्या आध्यात्मिक जीवनातील दातृत्व गुणासाठी श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांच्या हृद्य सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री.शंकरानंद स्वामीजी, डॉ.पराग मुंडले, मठाचे अध्यक्ष परशुराम पटेकर, सचिव भगवान राऊळ, सतीश राऊळ, मंगेश राऊळ, दीपक पटेकर, बबन साळगावकर आदी मान्यवर शेकडो भक्तगण उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा