You are currently viewing सिप्लाच्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये भोसले नॉलेज सिटीचे सुयश..

सिप्लाच्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये भोसले नॉलेज सिटीचे सुयश..

फार्मसीच्या 25 तर पॉलिटेक्निकच्या 14 विद्यार्थ्यांची निवड..

सावंतवाडी

येथील भोसले नॉलेज सिटीमध्ये देशातील आघाडीची औषध कंपनी सिप्ला फार्मास्युटिकल्सतर्फे कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीच्या गोवा येथील औषध प्रकल्पांसाठी या मुलाखती घेण्यात आल्या._
_यामध्ये यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या 25 विद्यार्थ्यांची तसेच यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या 14 विद्यार्थ्यांची यशस्वी निवड झाली. कंपनी गेली पाच वर्षे नियमितपणे हे कॅम्पस इंटरव्हयू घेत असून यामध्ये भोसले नॉलेज सिटीच्या विद्यार्थ्यांचे निवड होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे._
_विद्यार्थ्यांच्या या अभिनंदनीय निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, फार्मसी प्राचार्य डॉक्टर विजय जगताप, पॉलिटेक्निक प्राचार्य गजानन भोसले त्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − eight =