You are currently viewing कणकवली काँग्रेस तर्फे स्व. राजीव गांधी स्मृतिदिनी अभिवादन

कणकवली काँग्रेस तर्फे स्व. राजीव गांधी स्मृतिदिनी अभिवादन

कणकवली

आधुनिक भारताचे शिल्पकार संगणक युग व दूरसंचार क्रांतीचे प्रणेते देशाच्या विकासाला नवी दिशा देणारे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांचा आज तिसावा स्मृतिदिनी कणकवली काँग्रेस कार्यालयात यांना त्यांच्या पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली,  तालुका युवक अध्यक्ष निलेश तेली, तालुका उपाध्यक्ष निलेश मालवणकर, तालुका सरचिटणीस प्रवीण वरूनकर, रोहन शिंदे, दीपक यादव आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.  तसेच यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते कै. राजीवजी सातव व माजी कणकवली तालुका अध्यक्ष कै. बीके तांबे यांना यावेळी श्रद्धांजली वाहिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 7 =