You are currently viewing शिवराज मराठा विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

शिवराज मराठा विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

शिवराज मराठा विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

साळगाव, ता. कुडाळ :

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथे गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची ओळख, त्याचे महत्त्व तसेच संविधानाने नागरिकांना प्रदान केलेले मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रकट वाचनाने झाली. कुमारी आराध्य उत्तम धुरी हिने संविधानाच्या उद्देशिकेचे प्रभावी वाचन केले. त्यानंतर भारतीय संविधानाने दिलेले हक्क व कर्तव्ये यांचे संबंधित कलमांसह वाचन करण्यात आले. यामध्ये कुमार अर्णव पेडणेकर, रुही कुडाळकर आणि ध्रुव पालवे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुप्रिया पेडणेकर यांनी केले. यावेळी ‘भारतीय संविधानाची मूल्ये व महत्त्व’ या विषयावर विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री. एकनाथ कांबळे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सलीम तकीलदार, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कुमारी श्रावणी सामंत हिने केले.

विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि लोकशाही मूल्यांची रुजवण करणारा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा