You are currently viewing गोवा-धारगळ येथे कारला झालेल्या अपघातात ओरोस येथील पाच युवक गंभीर…

गोवा-धारगळ येथे कारला झालेल्या अपघातात ओरोस येथील पाच युवक गंभीर…

उभ्या डंपरला मागून धडक; दोघे पत्र्यात अडकले, फायर ब्रिगेड पथकाना काढले बाहेर

थांबलेल्या डंपरला कारची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात ओरोस येथील पाच युवक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास धारगळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडला. ही धडक इतकी जबरदस्त होती की यातील जखमी हिमांशू व रौनक देसाई हे दोघे पत्र्यात अडकले. त्या दोघांना फायर ब्रिगेडच्या पथकाने त्यांच्याकडे असलेल्या गाडीच्या साह्याने बाहेर काढले. तर यात सागर, विक्रम (दोघांची पुर्ण नाव माहीत नाही) आणि तन्मय खानोलकर हे तिघे जखमी झाले आहेत. त्या पाचही जणांना अधिक उपचारासाठी म्हापसा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा