You are currently viewing अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी 27 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करा – बालविकास प्रकल्प अधिकारी तारका साटम

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी 27 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करा – बालविकास प्रकल्प अधिकारी तारका साटम

सिंधुदुर्गनगरी

 दोडामार्ग तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस रिक्त पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवाराकडून  दिनांक 27 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी तारका बाळाजी साटम यांनी केले आहे.

          सदर अर्ज सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प दोडामार्ग कार्यालय यांजकडे स्विकारण्यात येणार आहेत. अधीक माहितीसाठी संबंधित सरपंच, गामपंपचायत कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालय दोडामार्ग 02363-256506,9421029556 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

          दोडामार्ग तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस रिक्त पदाची माहीती पुढीलप्रमाणे आहे. ग्रामपंचायतीचे नाव परमे- पणतुर्ली, महसूल गावाचे नाव, परमे, अंगणवाडी केंद्राची नाव परमे गावठण, रिक्त पद अंगणवाडी सेविका माधन 8 हजार 325. ग्रामपंचायतीचे नाव,परमे पणतुर्ली, महसूल गावाचे नाव पणतुर्ली, अंगणवाडी केंद्राची नाव परमे पणतुर्ली, रिक्त पद अंगणवाडी सेविका, मानधन 8 हजार 325. ग्रामपंचायतीचे नाव कुडासे,महसूल गावाचे नाव कुडासे,अंगणवाडी केंद्राचे नाव कुडासे गावठण, रिक्त पद अंगणवाडी मदतनिस, मानधन 4 हजार 425. ग्रामपंचायतीचे नाव झरेबांबर- आंबेली,महसूल गावाचे नाव झरेबांबर,अंगणवाडी केंद्राचे नाव झरेबांबर काजुळवाडी,रिक्त पद अंगणवाडी मदतनिस,मानधन 4 हजार 425. ग्रामपंचायतीचे नाव तळेखोल,महसूल गावाचे नाव तळेखोल,अंगणवाडी केंद्राचे नाव तळेखोल वाटूळवाडी, रिक्त पद अंगणवाडी मदतनिस,मानधन 4 हजार 425.ग्रामपंचायतीचे नाव कोनाळ,महसूल गावाचे नाव कोनाळ, अंगणवाडी केंद्राचे नाव कोनाळ मुख्यवसाहत, रिक्त पद अंगणवाडी मदतनिस, मानधन,4 हजार 425. ग्रामपंचायतीचे नाव, तळकट, महसूल गावाचे नाव तळकट, अंगणवाडी केंद्राचे नाव  तळकट कट्टावाडी, रिक्त पद अंगणवाडी मदतनिस, मानधन 4 हजार 425.

प्रतिक्रिया व्यक्त करा