You are currently viewing पोईप विभागात भाजपला धक्का

पोईप विभागात भाजपला धक्का

*पोईप विभागात भाजपला धक्का*

*भाजपचे मुरारी गावडे व ग्रा. पं. सदस्या मेघा गावडे यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश*

मालवण तालुक्यातील गोळवण गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते मुरारी चंद्रकांत गावडे आणि ग्रामपंचायत सदस्या मेघा मुरारी गावडे यांनी आज भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षाची शाल घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. गोळवण गावात मुरारी गावडे आणि मेघा गावडे यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांचा पक्ष प्रवेश करून शिवसेनेने भाजपला धक्का दिला आहे.
यावेळी उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर,युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, पोईप विभागप्रमुख विजय पालव,भाऊ चव्हाण, अरुण लाड, गोळवण येथील दिगंबर सावंत, राजू नाडकर्णी, सदानंद चिरमुले,रामचंद्र सावंत,मंगल चिरमुले,आनंद चिरमुले,नागेश चिरमुले,नामदेव गावडे,ओंकार नाडकर्णी, धनाजी चिरमुले, यशवंत चिरमुले आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा