You are currently viewing जानवली येथे दोन दुचाकीच्या धडकेत युवती जखमी…

जानवली येथे दोन दुचाकीच्या धडकेत युवती जखमी…

जानवली येथे दोन दुचाकीच्या धडकेत युवती जखमी…

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली रतांबी व्हाळ येथे आज दोन दुचाकींची धडक झाली. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात एका दुचाकीच्या मागे बसलेली युवती जखमी झाली आहे.

कणकवलीहून सचिन होळकर (वय ३६) आणि शेखर होळकर (वय ३२) दोन्ही रा.हुमरठ हे दुचाकीवरून हुरमठ येथे जात होते. त्‍या पाठोपाठ सुभाष बाबू शेळके (वय २०) आणि त्‍यांच्या मागे बसलेली स्नेहल संतोष कांबळे (वय २०) दोन्ही रा.वैभववाडी-भोम हे कणकवली ते वैभववाडी असा प्रवास करत होते.

दुपारी दीडच्या सुमारास सुभाष शेळके याच्या दुचाकीची धडक पुढे जाणाऱ्या सचिन होळकर याच्या दुचाकीला बसली. यात भरधाव वेगात असलेल्‍या दोन्ही दुचाकी पन्नास फुट महामार्गावर फरफटत गेल्‍या. या अपघातात दुचाकीवरील स्नेहल कांबळे हिच्या डोकीला मार बसल्‍याने ती गंभीर जखमी झाली आहे. अपघाताचे वृत्त समजताच त्‍याच भागात असलेले वाहतूक पोलीस प्रकाश गवस आणि संदेश आबिटकर हे तत्‍काळ घटनास्थळी दाखल झाले. यात महामार्गावरील दुचाकी बाजूला करून जखमी युवतीला तातडीने कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल करण्यात आले.

367

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =