You are currently viewing सोनुर्ली येथे रेल्वेच्या धडकेत गुरासह शेतकरी ठार..

सोनुर्ली येथे रेल्वेच्या धडकेत गुरासह शेतकरी ठार..

सोनुर्ली येथे रेल्वेच्या धडकेत गुरासह शेतकरी ठार..

सावंतवाडी

गुरे परतत असताना रेल्वेची जोरदार धडक बसल्यामुळे सोनुर्ली येथील शेतकऱ्यांसह त्याच्या एका म्हैशीचा मृत्यू झाला. ही घटना काल सकाळी कोल्हेभाटले परिसरात घडली. महादेव जगन्नाथ गावकर (वय ५८) असे त्यांचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान अचानक गावकर कुटुंबावर हा घाला कोसळल्यामुळे गावात शोककळा पसरली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. गावकर यांचे कोल्हे भाटले परिसरात घर आहे. नेहमीप्रमाणे गावकर हे आपल्या गुरांना घेऊन परिसरातील शेतीत चारा देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची काही गुरे रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे गेली. यावेळी त्या गुरांना परतण्यासाठी गावकर हे त्या ठिकाणी गेले मात्र गुरे परतत असताना त्यांचा पाय अचानक रेल्वे ट्रॅक मध्ये अडकला. त्यामुळे त्याच्यासह ट्रॅकवर असलेल्या म्हैशीला रेल्वेची जोरदार धडक बसली. यात ते दोघे जागीच गतप्राण झाले. याबाबतची माहिती संबंधित रेल्वेच्या चालकाने मळगाव रेल्वे स्टेशनला दिली. त्यानंतर तेथून सावंतवाडी पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन घटनेचा पंचनामा गेला. श्री. गावकर यांच्या पश्चात २ मुलगे, १ मुलगी व पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा