You are currently viewing आंबोली सैनिक स्कुलच्या माध्यमातून सावंतवाडीत २ जूनला शिवराज्यभिषेक सोहळा…

आंबोली सैनिक स्कुलच्या माध्यमातून सावंतवाडीत २ जूनला शिवराज्यभिषेक सोहळा…

मंत्री दीपक केसरकरांची प्रमुख उपस्थिती; सुधीर सावंतांच्या “थर्ड आय” पुस्तकाचे प्रकाशन होणार…

सावंतवाडी

आंबोली येथील सैनिक स्कुल आणि छत्रपती शिवाजी महाराज कृृषी विद्यालय किर्लोस-आरोस यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे ता. २ जून ला सकाळी ११ वाजता येथील उद्यानाच्या परिसरात शिवराज्यभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे उपस्थिती राहणार आहेत. यावेळी सुधीर सावंत यांनी लिहिलेल्या “थर्ड आय” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच महाराजांच्या जीवनावर आधारीत पोवाडा, व्याख्यान, देखावा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =