You are currently viewing दंगल घडविणार्‍या समाजकंटकांच्या मुसक्या आवळा

दंगल घडविणार्‍या समाजकंटकांच्या मुसक्या आवळा

वैभववाडी भाजपाचे तहसीलदार यांना निवेदन

वैभववाडी

अमरावती, नांदेड व मालेगाव या ठिकाणी घडलेल्या दंगली या समाजकंटकांनी घडवून आणलेल्या आहेत. या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. व दंगल घडविणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी. याबाबतचे निवेदन वैभववाडी भाजपाच्या वतीने तहसीलदार रामदास झळके यांना देण्यात आले आहे.
त्रिपुरा घटनेवरुन महाराष्ट्रात 12 व 13 नोव्हेंबर रोजी अमरावती, नांदेड व मालेगाव येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला गेला. यात अनेक व्यावसायिकांच्या दुकानांची तोडफोड झाली. त्यांचे अतोनात नुकसान झाले. या दंगलीत एका विशिष्ट समाजाच्या व धर्माच्या दुकानावर हल्ला करण्यात आला. त्यातूनच अमरावतीची परिस्थिती बिघडली. यामुळे जनता भयभीत झाली. घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेत काहींना टार्गेट करून याद्या तयार केल्या. तसेच सूडबुद्धीने कारवाई केली. चार चार पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली.
त्रिपुरा येथे जी घटना घडलीच नाही. त्याची अफवा सोशल मीडियावर पसरविण्यात आली. 12 तारीखला अनेक मोर्चे निघाले. हे मोर्चे मोठ्या षडयंत्राचा भाग होता. अराजकता माजवण्याचा प्रयत्न होता. मात्र 12 तारखेला काही घडलेच नाही असे सांगण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा प्रचंड दबावात आज काम करीत आहे. या घटनेत चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे. समाजकंटकांना मोकाट सोडून सर्वसामान्य जनतेवर कारवाई केली जात आहे. हे चुकीचे आहे. असे मोर्चे परत निघणार नाहीत. याची खबरदारी शासनाने घ्यावी. निर्दोष असणाऱ्यावर सूडबुद्धीने कारवाई होता कामा नये, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना माजी सभापती दिलीप रावराणे, जि.प. सदस्य सुधीर नकाशे, उपसभापती अरविंद रावराणे, शुभांगी पवार, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, किशोर दळवी, संजय सावंत, नवलराज काळे, प्रदीप नारकर, संताजी रावराणे, दाजी पाटणकर, उदय जैतापकर, बंधू वळंजू, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + thirteen =