You are currently viewing आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात कणकवलीत उद्या नियोजन बैठक

आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात कणकवलीत उद्या नियोजन बैठक

आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात कणकवलीत उद्या नियोजन बैठक

२५ जूनच्या ओरोस धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातीतील संघटना व समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन

कणकवली :

अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात आयोजित करण्यात आलेल्या २५ जून रोजीच्या धरणे आंदोलनाच्या तयारीसाठी कणकवली तालुकास्तरीय नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातींना दिलेले आरक्षण, सामाजिक न्याय आणि संविधानिक अधिकार अबाधित राहावेत, यासाठी सर्व समाजघटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. राज्यात अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी २५ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या यशस्वी नियोजनासाठी कणकवली तालुक्यातील अनुसूचित जातीतील सर्व धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, युवक संघटना, त्यांचे पदाधिकारी तसेच समाजबांधवांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“चला एकत्र येऊया, हक्क वाचवूया आणि भविष्य घडवूया” या घोषवाक्यासह एकता, समता आणि न्याय या मूल्यांच्या संरक्षणासाठी समाजाने एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन संविधानिक हितकारिणी महासंघ, कणकवली आणि चर्मकार उन्नती मंडळ, कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा