You are currently viewing सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीच्या उपाध्यक्षपदी दीपक केसरकर यांची नियुक्ती
Oplus_16908288

सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीच्या उपाध्यक्षपदी दीपक केसरकर यांची नियुक्ती

रत्नागिरी जिल्ह्यासाठी डॉ. विनय नातू यांची निवड; शासनाने नियुक्तीचा आदेश केला जारी

सावंतवाडी :

‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ अंतर्गत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी गठित करण्यात आलेल्या स्वतंत्र ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’च्या उपाध्यक्ष पदांची घोषणा करण्यात आली आहे. या नव्या नियुक्तीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यकारी समितीच्या उपाध्यक्षपदी दीपक केसरकर तर रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्यकारी समितीच्या उपाध्यक्षपदी डॉ. विनय नातू यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे.

या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे उप सचिव नि. भा. खेडकर यांच्या स्वाक्षरीने आज निर्गमित करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य आणि परिणामकारक नियोजन करून या भागाचा सर्वंकष विकास साधणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ही महत्त्वाकांक्षी योजना सन २०२६-२७ ते २०२८-२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यास १८ मे २०२६ च्या शासन निर्णयान्वये आधीच मान्यता देण्यात आली होती.

या योजनेचा भाग-२ अंतर्गत एक स्वतंत्र आणि ठोस आराखडा तयार करून त्याची वेळेत आणि कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांकरिता स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा