You are currently viewing २० डिसेंबर पर्यंत राज्यातील सहकारी संस्था, सहकारी बँका, पतसंस्था निवडणूका पुढे ढकलल्या
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

२० डिसेंबर पर्यंत राज्यातील सहकारी संस्था, सहकारी बँका, पतसंस्था निवडणूका पुढे ढकलल्या

मुंबई :

 

राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी सुरू असल्याने राज्य सहकारी प्राधिकरणाने राज्यातील सहकारी संस्था, सहकारी बँका, पतसंस्था यांच्या निवडणूका २० डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तस आदेश सहकार प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी जारी केले आहेत. या आदेशामुळे राजापूर तालुक्यातील राजापूर अर्बन बँकेसह अन्य संस्थांच्या निवडणूका २० डिसेंबर नंतर होणार आहे.

राज्यात ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. त्याचप्रमाणे ७ हजार १४७ सहकारी संस्थांचा निवडणूकीचा कार्यक्रमही राज्यात जाहीर झालेला आहे. मात्र या दोन्ही निवडणूका या एकाच कालावधीत असल्याने जास्तीत जास्त मतदारांना निवडणूकीत सहभाग नोंदविता यावा यासाठी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क, क मधील तरतुदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात, वर्ग “क”, “ड” तसेच वर्ग “इ” प्रकारच्या सहकारी संस्था त्याचप्रमाणे ज्याप्रकरणी मा. उच्च/ मा. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केलेले आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील “अ” व “ब” वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूका शासन आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्यावर असतील त्या टप्प्यावर दिनांक २०/१२/२०२२ पर्यंत पुढे ढकललेल्या आहेत. ज्या वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूका संदर्भीय शासन आदेशानुसार पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत त्यांच्या निवडणूका घेण्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणूका घ्यावयाच्या आहेत असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

त्यामुळे जिल्हयातील या गटातील सहकारी बँका, संस्था, पतसंस्था यांच्या निवडणूका या २० डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + eighteen =