You are currently viewing ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांच निधन…

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांच निधन…

मुंबई :

 

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे आज सकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं.

ते ६८ वर्षांचे होते. अविनाश खर्शीकर यांची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून चिंताजनक बनली होती. अखेर  सकाळी ठाणे येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं होतं. त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाली होती.

 

अविनाश  खर्शीकर यांनी 1978 मध्ये ‘बंदिवान मी या संसारी’ या मराठी सिनेमाच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला सुरूवा केली होती. जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार या सारख्या अनेक सिनेमात अविनाश खर्शीकर यांच्या भूमिका गाजल्या होत्या.

त्यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर सुकन्या मोने, विजू माने, रेणुका शहाणे, अमोल कोल्हे आदी अनेकांनी दु:ख व्यक्त केलं. त्यांनी काही मालिकांमध्येही काम केलं. यात उल्लेख करायला हवा तो दामिनी या मालिकेचा. नव्वदच्या दशकात अत्यंत चार्मिंग दिसणारा अभिनेता म्हणून त्यांची गणना केली जायची. अलिकडच्या काळात शेमारु या कंपनीसाठी ते कार्यरत होते. अगदी दोन दिवसांपूर्वी पर्यंत ते नव्या नियोजनात व्यग्र होते. पण आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =