You are currently viewing माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली सावंतवाडी मतदार संघात मविआची प्रचारात आघाडी

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली सावंतवाडी मतदार संघात मविआची प्रचारात आघाडी

सावंतवाडी :

 

खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी तालुक्यात माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा पंचायत समिती जोरदार बैठका पार पडल्या. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी मा. विकास भाई सावंत, जिल्हा प्रमुख संजय पडते, उपनेते जानवी सावंत, विधानसभा संपर्क शैलेश परब, दिलीप नार्वेकर साक्षी वंजारी चंद्रकांत गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, मायकल डिसूजा, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, रवींद्र म्हापसेकर, समीर वंजारी सहभागी झाले होते.सदर बैठका कलंबिस्त करीवडे आरोंदा साटेली माडखोल आदी ठिकाणी पार पडल्या.

यावेळी प्रवीण भाई यांनी दीपक केसरकर पंधरा वर्षे मतदारसंघाचा विकास करायला कमी पडले. त्यामुळे त्यांना आता नारायण राणेंची पाय धरणाची वेळ आली, अशी टीका केली. भाजप सरकार हे खोटी आश्वासने व फसव्या योजना राबवून जनतेची दिशाभूल करत असल्याचं निवडणुकीत त्यांना जनतेने योग्य दाखला दाखवावी असा आवाहन केलं.

संजय पडते यांनी खासदार विनायक राऊत हे सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत. त्यांना कोणती व्यक्ती जाऊन भेटू शकते. मात्र नारायण राणेच तसं नाही त्यांना भेटण्यासाठी आधी मधी माणसा लागतात. त्यामुळे खासदार हा सर्वसामान्यांचा असला पाहिजे, ज्याला जनता कधीही भेटू शकते अशा टीका केली.

विकास सावंत यांनी कोरोनाच्या काळात दीपक केसरकर सर्वसामान्यांमध्ये होते का? तसेच आजपर्यंत दीपक केसरकारांनी वेळोवेळी आपल्या सोयीच राजकारण केला आहे अशी टीका केली.

जानवी सावंत यांनी या देशात लोकशाही, सविधान न्यायव्यवस्था वाचली पाहिजे त्यामुळे अशा तऱ्हेची देशातली हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी विनायक राऊत आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी राहिला पाहिजे अस आवाहन केलं.

तर दिलीप नार्वेकर यांनी गद्दारांना धडा शिकवला पाहिजे आज महाराष्ट्राची लोकशाही ला काळीमा फासण्याचा काम या गद्दाऱ्यांनी केलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा