You are currently viewing दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गकडून प्रा .हरि नरके यांना आदरांजली

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गकडून प्रा .हरि नरके यांना आदरांजली

मसुरे

 

दिवंगत प्रा. हरी नरके हे बहुजन समाजाला फुले शाहू आंबेडकर यांचा वैचारिक वारसा समजावून सांगणारे मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी स्तंभलेखक व समता परिषदेचे सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख होती.त्यांच्या अकाली जाण्याने आपण एका चतुरस्त्र व परखड अभ्यासक विचारवंताला गमावून बसलो आहोत असे मत प्रा. सिध्दार्थ तांबे यांनी व्यक्त केले.

दर्पण प्रबोधिनीच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रा. हरी नरके याना आदरांजली वाहण्यात आली.

हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले होते. महात्मा फुले हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता. पण त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळी हा ही त्यांचा अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य सोबतच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची फोटो बायोग्राफी सुद्धा संपादित केली असल्याचे राजेश कदम यांनी सांगितले.

प्रा. हरी नरके यांनी बाबासाहेब आंबेडकरांची फोटोग्राफी प्रसिद्ध केली. त्यांनी छान पुस्तकं तयार केली. महात्मा फुले यांच मूळ चित्र शोधून काढलं, आमच्या प्रत्येक कार्यक्रमात, हरी नरके आमचा वैचारिक पाठिंबा होता. अलीकडे आरक्षणाच्या बाबतीत ते माहिती पुरवायचे. समता चळवळीचे आघाडीचे शिलेदार,ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक श्री.हरी नरके यांचे दुर्दैवी निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे.

त्यांच्या अकाली जाण्याने बहुजन चळवळीचे अपरिमित नुकसान झालं आहे असे अध्यक्ष आनंद तांबे म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष नरेंद्र तांबे, सहसचिव संदेश कदम डॉ.सोमनाथ कदम,सुनील तांबे, श्रीधर तांबे,संतोष तांबे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा