You are currently viewing गौरी फटनाईक यांचे सातवे रक्तदान; गरजू रुग्णासाठी धावून येत जपली माणुसकी!

गौरी फटनाईक यांचे सातवे रक्तदान; गरजू रुग्णासाठी धावून येत जपली माणुसकी!

गौरी फटनाईक यांचे सातवे रक्तदान; गरजू रुग्णासाठी धावून येत जपली माणुसकी!

‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेच्या नियमित रक्तदात्या गौरी फटनाईक यांचा स्तुत्य उपक्रम; दयानंद मालणकर यांच्यासाठी केले रक्तदान

सिंधुदुर्ग :.

गोवा येथील व्हिजन हॉस्पिटल, म्हापसा येथे उपचार घेत असलेले किर्लोस येथील दयानंद मालणकर यांना बी पॉझिटिव्ह रक्ताची तातडीने गरज भासली. यावेळी ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेच्या नियमित रक्तदात्या गौरी फटनाईक (रा. मातोंड-पेंडुर) यांनी तत्परता दाखवत अजिल्लो हॉस्पिटलच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले.
गौरी फटनाईक यांचे हे सातवे रक्तदान असून, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, संस्थेने सन्मानपूर्वक भेट दिलेला टी-शर्ट परिधान करूनच त्या रक्तदानासाठी गेल्या होत्या. त्यांच्या या कृतीतून रक्तदानाबद्दलची निष्ठा आणि सामाजिक जाणीव दिसून आली.
या रक्तदानासाठी आवश्यक समन्वय साधण्यात नितेश सावंत (ओवळीये) यांनी विशेष प्रयत्न केले. ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक गवस साहेब यांनीही गौरी फटनाईक यांच्या कार्याचे कौतुक केले.
गरजू रुग्णाला वेळेत रक्त उपलब्ध करून देत माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या गौरी फटनाईक यांना ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेच्या वतीने मानाचा मुजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा