You are currently viewing सिंधुदुर्गला पून्हा एकदा जनता कर्फ्यूची गरज. . .

सिंधुदुर्गला पून्हा एकदा जनता कर्फ्यूची गरज. . .

सरपंच संघटनेची मागणी : जिल्हावासियांना आवाहन

सावंतवाडी :

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या चाकरमान्यांना किंवा गणेशभक्तांसाठी आपल्या गावात घरगुती गणपती उत्सव साजरा करण्यासाठी दिलेल्या सवलतीमुळे गेल्या साडे पाच महिन्यांत केवळ नाममात्र असणारी कोरोना पाॅझीटिव्ह ऐव्हढेच नव्हे तर पूर्वी रुग्ण बरा होण्याचा असलेला रेपोरेट बदलून मृत्यू होण्याचे प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढलेय ही अत्यंत चिंताजनक बाब सिंधुदुर्ग जिल्हा साठी होत आहे.

यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी आपण सर्वानी एकत्रित येऊन पून्हा जनता कर्फ्यूची मागणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे जर आपण यात आपला वैयक्तिकरित्या फायद्यासाठी सहकार्य केले नसेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानवी हानी होण्याची शक्यता असून ती फार च भितीदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. यापेक्षाही आरोग्य विभागच अंथरुणावर खिळून प्रसंगी अंपग होऊ शकतो यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम जिल्हावासियांना विनंती कराविशी वाटते की पून्हा एकदा आपण सर्व जण जनता कर्फ्यू ची मागणी करुन प्रशासनाला विनंती करून राबवूया तरच आणि तरच आपण आपला जिल्हा वाचवू शकू असे आवाहन सरपंच संघटना सिंधुदुर्ग जिल्हाधक्ष प्रेमानंद देसाई व सचिव दादा साईल यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − 5 =