You are currently viewing कणकवली तालुक्यातील कळसुलीत भाजपला धक्का

कणकवली तालुक्यातील कळसुलीत भाजपला धक्का

*युवा नेते प्रफुल्ल सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश*

*कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघांतील. विकासासाठी कटिबद्ध; प्रफुल्ल सुद्रिक*

कणकवली :

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांच्या पुढाकाराने व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कळसुली येथील भाजपचे ग्रामपंचायत सदस्य किशोर घाडीगांवकर,ग्रामकमिटी सदस्य तथा माजी ग्रामपंचायत सदस्य तथा वारकरी संप्रदाय समिती उपाध्यक्ष सत्यजित परब, अशोक वायंगणकर, कणकवली तालुका भाजपचे युवा मोर्चा प्रमुख, कळसुली सोशल मीडिया प्रमुख रूजाय फर्नांडिस, डेव्हिड फर्नांडिस, जॉन फर्नांडिस, सार्बीयो फर्नांडिस, मॅक्सी फर्नांडिस, मिनीन फर्नांडिस, रणजीत सावंत, इशेद फर्नांडिस, मायकल फर्नांडिस, शोभा घाडीगांवकर, सुप्रिया घाडीगांवकर, चंद्रकला घाडीगांवकर, आयुष्का घाडीगांवकर, वेदांत घाडीगांवकर, प्रयाग घाडीगांवकर, उत्तम घाडीगांवकर, तन्वी घाडीगांवकर, साक्षी घाडीगांवकर, यश घाडीगांवकर, प्रतीक घाडीगांवकर, पर्शुराम घाडीगांवकर, हनुमंत घाडीगांवकर, सौ. गौतमी घाडीगांवकर, यांचा प्रवेशकर्त्या मध्ये समावेश असून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या मनमानीला तसेच भाजप मध्ये स्थानिक पातळीवर पक्षाचे काम करत असताना कळसुली मतदारसंघांमध्ये विकास कामांची भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून नेहमी नकारात्मक भूमिका घेतली जात होती. त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास प्रक्रियेला खिळ बसली होती, म्हणून आम्ही भाजपच्या संघटन प्रक्रिये पासुन अलिप्त होतो. मात्र या गावचे रहिवासी तथा माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कै,सुरेश सुद्रिक यांनी कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये काही प्रमाणात विकास कामांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतू त्यांचे विकासाचे ध्येय अपूर्ण राहिले, मात्र त्यांचे चिरंजीव तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांनी या भागाच्या विकासासाठी गेल्या वर्षभरात सुरू केलेले प्रयत्न पाहून सुद्रिक यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेत काम केल्यास गावचा आणि या भागाचा विकास होईल या भावनेतून आम्ही आज भारतीय जनता पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेतला. यापुढे आम्ही सर्वजण एकसंघ पणे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला आणून देऊ असा निर्धार पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, सरचिटणीस भास्कर परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, रंजन चिके, अनंत पिळणकर, देवेंद्र पिळणकर, कळसुली सरपंच सौ. साक्षी परब, माजी सरपंच अतुल दळवी, युवक जिल्हा उपाध्यक्ष अॅड भरत गांवकर, संतोष मुरकर आर.बी. सावंत यांचेसह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 13 =