You are currently viewing कुंभारमाठ येथे दुचाकी अपघातात राजस्थान येथील कामगाराचा मृत्यू

कुंभारमाठ येथे दुचाकी अपघातात राजस्थान येथील कामगाराचा मृत्यू

मालवण :

 

मालवण कुंभारमाठ येथे कारला ओव्हरेटक करताना दुचाकीचा अपघातात झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या अपघातात मुरारी जाटव (२५ मूळ रा. राजस्थान) व देसवीर जाटव (२५ मूळ रा. राजस्थान) हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. वाहतूक पोलीसांच्या मदतीने दोघा जखमींना रूग्णवाहिकेच्या साहाय्याने मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु मुरारी जाटव याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. तर देसवीर जाटव याच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ओरोस येथे राजस्थान येथील कामगार वास्तव्यास आहेत. सोमवारी यामधील मुरारी जाटव, देसवीर जाटव, अरूण जाटव, सोनू जाटव हे चौघे दुचाकीने मालवण येथे फिरावयास आले होते. मालवणहून ओरोसला जात असताना अपघात झाला. मुरारी जाटव याच्या डोक्याला गंभीरित्या दुखापत झाली होती तर देसवीरही जखमी झाला होता.

वाहतूक पोलीसांनी ग्रामीण रूग्णालयात हलविले या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस दिपक तारी, महेंद्र देऊलकर, नितीन शेटये, अविनाश गायतोंडे यांनी स्थानिकांच्या मदतीने मुरारी जाटव व देसवीर जाटव यांना रुग्णवाहिकेने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु मुरारी जाटव याचा मृत्यू झाल्याचे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, पोलीस कर्मचारी महादेव घागरे यांनी मालवण ग्रामीण रूग्णालय येथे धाव घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 12 =