You are currently viewing वेंगुर्ले येथे इनरव्हिल क्लब व डॉ.महिला क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा

वेंगुर्ले येथे इनरव्हिल क्लब व डॉ.महिला क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला येथे महिला दिनाचे औचित्य साधून इनरव्हिल क्लब व डॉ.महिला क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सौ. वृंदा गवंडळकर व डॉ.सौ.अफशान कौरी यांच्या हस्ते दिपप्रज्वलाने करण्यात आली.

त्यानंतर पुढील स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये १०० मिटर धावणे, लिंबू चमचा, रस्सीखेच, गोंता उडी, दोरी उड्या, सुर्य नमस्कार, बॅडमिंटन या सारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये २५० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धा परीक्षक म्हणून श्री जयराम वायंगणकर सर, श्री.हेमंत गावडे सर, श्री.गौरेश, सौ.संजिवनी चव्हाण मॅडम, श्री चुडनाईक सर यांनी काम पाहिले. प्रथम तीन क्रमांकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. सुत्रसंचालन सौ.प्रगती चव्हाण यांनी केले. तसेच डॉ. सौ.स्नेहा नवार यांनी आयोजकांचे व उपस्थित स्पर्धकांचे आभार मानले.

यावेळी डॉ.सोनाली सावंत, डॉ.सई लिंगवत, डॉ अफशान कौरी, रेखा नाईक, डॉ. गार्गी पेठे, डॉ. अंकिता निखारगे, डॉ. मेघना मुसळे, सौ.पुनम, डॉ.हर्षाली ठाकूर, सौ.रसिका, डॉ.दिपाली पालयेकर, सौ.साई, डॉ. प्रणाली सावंत, सौ.आकांक्षा, डॉ. स्नेहा, सौ.मंजुषा, सौ.श्रेया इ.उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा