You are currently viewing शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एलजीबीटी सेलची स्थापना…..

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एलजीबीटी सेलची स्थापना…..

मुंबई

एल.जी.बी.टी (समलैंगिक) समुहासमोर शिक्षण, आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसने हे वचन पूर्ण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज एल.जी.बी.टी सेलच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.

ट्रान्सजेंडरसह समाजातील इतर घटकांचा समावेश असणाऱ्या LGBT समुदायाला आपल्या हक्कांसाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो. समाजात त्यांना सन्मानजनक वागणूक मिळत नाही. त्यामुळेच समानतेसाठी हा समुदाय आता एकत्र येत लढा देत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात LGBT सेलची स्थापना केल्याने आगामी काळात इतर राजकीय पक्षही या समुदयाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

LGBT समुदाय आपले हक्क मिळवण्यासाठी जागृत झाला असून त्यांना समानतेची वागणूक मिळायला हवी, अशी भूमिका राष्ट्रवादीने स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले की, निवडणूक काळात करण्यात आलेल्या जाहीरनाम्यानुसार याबाबत आम्ही पाऊल उचलत आहोत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्याअंतर्गत एलजीबीटी वेलफेयर बोर्डाला प्राथमिकता देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याद्वारे LGBT समुदायाचा अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या सेलच्या नवनियुक्त प्रमुख प्रिया पाटील यांना कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्रोत्तर काळातही आजवर समाजाच्या मुख्य धारेपासून शेकडो कोस दूर असणाऱ्या ‘LGTQ’साठी राष्ट्रवादी आपलं हक्काचं राजकीय अवकाश उपलब्ध करुन देत आहे.देशात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस या समुदायासाठी वेगळा सेल तयार करत आहे. LGBTQ समुदायाच्या न्याय्य हक्कांसाठी,राजकीय व सामाजीक क्षेत्रात स्थान मिळविण्यासाठी हा सेल कार्यरत राहील,अशी आम्हाला अपेक्षा आहे.या सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती झाली असून,हा सेल रचनात्मक काम करण्यासाठी कटीबद्ध असेल. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा,’ असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 1 =