You are currently viewing मळगाव येथे उद्या  हनुमान जन्मोत्सव सोहळा

मळगाव येथे उद्या हनुमान जन्मोत्सव सोहळा

सावंतवाडी

मळगाव ब्राह्मणआळी – पिंपळवाडीयेथील श्री जय हनुमान कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने पिंपळवाडी येथील जय हनुमान मंदिर येथे गुरुवार ६ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त सकाळी ७ वाजता अभिषेक, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता स्थानिक भजन मंडळांची भजने होणार आहेत. रात्री ९.३० वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘मायावी सुवर्ण नगरी’ हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा व नाट्यप्रयोगाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जय हनुमान कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा