You are currently viewing आंबोली घाटाला पर्यायी रस्त्यासह सोनवडे व आंजिवडे घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा…राजन तेली

आंबोली घाटाला पर्यायी रस्त्यासह सोनवडे व आंजिवडे घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा…राजन तेली

सार्वजनिक बांधकाम मंत्र्याकडुन सकारात्मक भूमिका, लवकरच बैठक लावण्याचे आश्वासन…

सावंतवाडी

आंबोली घाटाला पर्याय ठरणार्‍या चौकुळ, नेनेवाडी, फणसवडे रस्त्यासह घोडगे-सोनवडे आणि आंजिवडे घाटाचा अनेक वर्षे रखडलेला तिढा मार्गी लावा, अशी मागणी सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. दरम्यान हे रस्ते मार्गी लागल्यास घाट रस्त्याचा प्रश्न सुटण्याबरोबर कोकणाचा विकास होईल, त्यामुळे चतुर्थीनंतर लवकरच याबाबत बैठका घेवून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन श्री. चव्हाण यांनी दिले. जिल्हा दौर्‍यावर असलेल्या श्री. चव्हाण यांची आज राजन तेली यांनी भेट घेतली. यावेळी घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा, अशी त्यांनी मागणी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =