सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जनरल सर्जन म्हणून डॉ. रुपेश कुमार जहा यांची नियुक्ती; 8 दिवसात मागणी मान्य
उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांच्या मागणीनुसार केली नियुक्ती
सावंतवाडी –
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जनरल सर्जन म्हणून डॉ. रुपेश कुमार जहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांनी कोल्हापूरचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्याकडे याबाबत मागणी केली होती*.
*मागणी केल्यानंतर अवघ्या 8 दिवसातच ही नियुक्ती झाल्याने सावंतवाडी तालुक्याच्या जनतेच्या वतीने श्री. मसुरकर यांनी डॉ. दिलीप माने यांचे आभार व्यक्त स्वागत करून आभार केले आहेत.*
*नियुक्ती का गरजेची होती?*
*महाराष्ट्र शासनाने राज्यात 1400 नवीन डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. यासाठी आरोग्य मंत्री सन्माननीय प्रकाश आबिटकर यांचे स्वागत तसेच आभार करत आहोत.*
*तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात यापूर्वी जनरल सर्जन म्हणून डॉ. पांडुरंग वज्राटकर जनरल सर्जन कार्यरत होते. त्यांचा कार्यभार तसेच निवृत्ती संपल्यामुळे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या.*
*त्यानंतर जनरल सर्जन डॉ. गिरीश चौगुले जनरल सर्जन हे सोमवार, बुधवार, शुक्रवार असे तीन दिवस सावंतवाडीला, तर उर्वरित दिवस वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक म्हणून वेंगुर्ला येथे काम करत होते. त्यामुळे दोन्हीकडे कामाचा ताण येत होता.*
*ही सर्व परिस्थिती श्री. राजू मसुरकर यांनी उपसंचालक डॉ. दिलीप माने यांना निवेदन देऊन व प्रत्यक्ष बोलणी करून सांगितली होती*
*मुंबईहून काही काळ शासकीय रुग्णांमध्ये काम केल्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये बदली झाली होती एकूण बारा वर्षे जनरल सर्जन म्हणून त्यांनी रुग्ण सेवा बजावली आहे त्यानंतर सावंतवाडीला बदली*झाली आहे*
*डॉ. दिलीप माने उपसंचालककोल्हापूर यांनी तात्काळ दखल घेऊन मुंबईत कार्यरत असलेले डॉ. रुपेश कुमार जहा जनरल सर्जन यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जनरल सर्जन म्हणून नियुक्ती केली.*
*यासाठी जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे जिल्हा वैद्यकीय सल्लागार डॉक्टर तुषार चिपळूणकर त्यांचे आभार सिंधुदुर्ग तसेच सावंतवाडी तालुक्यातील जनतेच्या वतीने जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी स्वागत करून आभार मानले आहेत*
*तसेच नवनियुक्ती झालेले डॉ. रुपेश कुमार जहा जनरल सर्जन यांचे स्वागत जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सावंतवाडी तालुक्याच्या वतीने श्री. राजेंद्र (राजू) मसुरकर यांनी केले आहे*
*तसेच डॉक्टर विशाल रेड्डी हृदयरोग तज्ञ यांनी त्यांचे स्वागत सुरू केले असून आज रुग्णालयामध्ये डॉक्टर रुपेश कुमार यांना दाखल करून घेण्यात आले आता आठ दिवसातच कायमस्वरूपी नियुक्ती होऊन कार्यरत होणार आहे*
