You are currently viewing आदर्श इन्स्टिटयूट, विटा च्या विद्यार्थ्यांना ब्रिटन चे द्वार उच्चशिक्षणासाठी सदैव खुले : मिशेल ब्राउन यांचा विश्वास

आदर्श इन्स्टिटयूट, विटा च्या विद्यार्थ्यांना ब्रिटन चे द्वार उच्चशिक्षणासाठी सदैव खुले : मिशेल ब्राउन यांचा विश्वास

विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

आदर्श इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, विटा येथील आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्षाच्या (International Affairs Cell) वतीने विद्यार्थ्यांना युनायटेड किंगडम (UK) मधील उच्च शिक्षणाच्या संधी, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धती आणि करिअरच्या विविध संधी यांची माहिती करून देणेसाठी International Pathways: Education and Opportunities in the UK या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

या चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ब्रिटनमधील सुश्री मिशेल ब्राउन (संचालिका, आंतरराष्ट्रीय भरती प्रक्रिया, मँचेस्टर, ब्रिटन ) उपस्थित होत्या. तसेच श्री. अविनाश रामचंद्र वाघ (संचालक, प्रोफेशनल एज्युकेशनल कन्सल्टन्सी, पुणे ), श्री. प्रशांत वंजारी (प्रदेश प्रमुख इन्फिनिटी ग्रुप, महाराष्ट्र ) आणि सुश्री यामिनी मल्होत्रा (जनरल मॅनेजर इन्फिनिटी ग्रुप, महाराष्ट्र ) यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी मान्यवरांनी ब्रिटनमधील उच्च शिक्षण संस्थांची माहिती, प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, शिष्यवृत्तीच्या संधी, शिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधी तसेच जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुभवांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे चर्चासत्र अत्यंत माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरले.

या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सदाशिवराव (भाऊ) पाटील, अध्यक्ष मा. ॲड. वैभव (दादा) पाटील, संचालक श्री. पी. टी. पाटील, संचालिका कु. पूजा पाटील, आर्थिक संचालक श्री. रवीराज सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. महाजन तसेच रजिस्ट्रार श्री. अजितसिंह चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्षाचे समन्वयक प्रा. आर. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या नव्या संधींची ओळख झाली असून, जागतिक स्तरावर शैक्षणिक व व्यावसायिक प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा