*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सरगांठ*
(संदर्भ:समाजात वाढत असलेले घटस्फोट)
नात्यांच्या गाठींनाही एक सरगाठ असावी
भलेही गांठी वरच्याने मारल्या असतील
निसटू नये नाती खालती म्हणून
एक सरगांठ मारलेली असावीच असावी
निसटते सरगांठ तेंव्हा आणि हो तेंव्हाच
सर मोत्यांचाही सरसर निसटून जातो
भले,ओवले असतील हिरे,पाचू,मोती
दोष त्या न मारलेल्या सरगांठीचाच असतो
तू काय अन मी काय
इथंच तर राहणार आहोत आपण
असंही म्हंटलं तरी जोडायला
आधार सरगांठीचाच असतो
सरगांठ मारतांना जरी
घेतली खबरदारी सारी
तरी सरगांठ मारण्याआधी
दोरा तेवढा तुटायला नको !
आजकाल नात्यांनाही
असत नाही काही ग्यारंटी
म्हणूनच तर माराव्या लागतात
गाठीं गाठींवर सरगांठी
—राजा जोशी
9823687519
〰️〰️〰️〰️〰️
