You are currently viewing प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या नाट्य कलाकारांनी सादर केले “प्रेमा तुझा रंग कसा “नाटक

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या नाट्य कलाकारांनी सादर केले “प्रेमा तुझा रंग कसा “नाटक

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या नाट्य कलाकारांनी सादर केले “प्रेमा तुझा रंग कसा “नाटक

प्राधिकरण, निगडी-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

दिनांक २ मार्च २०२४- मनोहर वाढोकर सभागृहात
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित, प्रा. वसंत कानेटकर लिखित, प्रेमाचे गहिरे रंग उलगडणारे अजरामर नाटक “प्रेमा तुझा रंग कसा” हे संघाच्या ज्येष्ठ कलाकारांनी सादर केले.
नाटकाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला . या नाटकाचा प्रयोग अत्यंत नेटका, बहारदार आणि एखाद्या व्यावसायिक नाटकाच्या तोडीचा झाला ,असे मत प्रेक्षकांनी प्रत्यक्ष भेटून व्यक्त केले.
नाटकाचे दिग्दर्शन श्री. अशोक अडावदकर यांनी उत्कृष्ट रित्या केले होते. या नाटकात ज्योती कानेटकर ( प्रियंवदा) , सुभाष भंडारे (बाजीराव), अनुराधा पेंडुरकर (बब्बर), चंद्रशेखर जोशी ( बच्चू) , सुनिता येन्नूवार ( सुशील) सतीश सगदेव ( निळूभाऊ) आणि अशोक अडावदकर ( प्रा. बल्लाळ) या भूमिका उत्तम रीतीने सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
सर्व कलाकारांचा सत्कार, सौ शैलजाताई मोरे मा. उपमहापौर पिंपरी चिंचवड मनपा यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच सौ.शोभा भंडारे यांचा सत्कार त्यांच्या विशेष योगदानासाठी शाल व श्रीफळ देऊन शैलजाताईच्या हस्ते करण्यात आला. या नाटकासाठी डॉ.ज्योती इंगोले, नाट्य समिती प्रमुख, ज्येष्ठ नागरिक संघ प्राधिकरण यांचे सहकार्य लाभले. पन्नास वर्षांपूर्वी ज्यांनी ह्या नाटकात भूमिका केल्या होत्या अशा ३ कलाकारांचा यथोचित गौरव करण्यात आला.त्यामुळे पूनःप्रत्ययाचा आनंद त्यांना मिळाला. ह्या नाटकाचे गारुड , इतक्या कालावधीनंतर सुध्दा रसिकांवर आहे हेच सिद्ध झाले.
रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे, संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते, रसिकांनी, नेमक्या ठिकाणी उस्फूर्त दाद देऊन, कलाकारांना प्रोत्साहन दिले.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 14 =