You are currently viewing वेंगुर्ला शिरोडा रस्त्याची आठ दिवसात दुरुस्ती करा; अन्यथा आंदोलनाचा शिवसेनेचा इशारा….

वेंगुर्ला शिरोडा रस्त्याची आठ दिवसात दुरुस्ती करा; अन्यथा आंदोलनाचा शिवसेनेचा इशारा….

वेंगुर्ला शिरोडा खड्डेमय झालेल्या रस्त्याची येत्या आठ दिवसांत दुरुस्ती करा

उभादांडा शिवसेना विभाग प्रमुख कार्मिस आल्मेडा यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे बांधकाम अधिकार्‍यांना निवेदन.

वेंगुर्ला
शिरोडा मार्गावर ठीकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता असल्याने या खड्डेमय झालेल्या रस्त्याची येत्या आठ दिवसात दुरुस्ती करा, या मागणीचे निवेदन उभादांडा विभागप्रमुख कार्मिस आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली उभादांडा शिवसेना पदाधिकार्‍यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी शाखाप्रमुख रजत साळगांवकर,नामदेव कुडाळकर,मोचेमाड उपसरपंच श्रीकांत घाटे,निलेश चमणकर आदी उपस्थित होते.

या निवेदनात असे म्हटले की वेंगुर्ला – रेवस -शिरोडा रस्ता हा मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाला आहे.खड्डेमय झालेल्या या रस्त्यामुळे रस्त्यावर दररोज अपघातांची मालिका सुरू आहे.
उभादांडा वाघेश्र्वरवाडीपासून, कांबळीवाडी, सुखटनवाडी, वरचेमाडवाडीमध्ये, तर पादचारी चालतानाही जखमी होत आहेत. तसेच हा रस्ता मोचेमाड पासून पुढे शिरोडा पर्यंत पूर्णपणे खड्डेमय झाल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे मोठी वाहने तसेच मच्छीमार, शेतकरी, बागायतदार,लोकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून येत्या आठ दहा दिवसात या रस्त्याची डागडुजी न केल्यास कोणतीही पूर्व कल्पना न देता ग्रामस्थांना घेऊन रास्तारोको करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + fifteen =